Wakad : घरगुती भांडणात महिलेचा गर्भपात; चौघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. त्यासाठी विवाहितेला नकार दिला असता तिला मारहाण केली. त्यात तिचा गर्भपात झाला. याप्रकरणी सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शाहूनगर चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुरज शिवाजी वाडघरे, सासरे शिवाजी वाडघरे, सासू पारू वाडघरे, नणंद स्मिता सचिन रेणुसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेकडे वेळोवेळी माहेरून पैसे आणण्याची मागणी केली. सासरच्यांची ही मागणी पूर्ण न केल्याने महिलेला त्यांनी मारहाण केली. महिला दोन महिन्यांची गरोदर असताना पती सुरज याने त्यांच्या पोटावर मारहाण केली. त्यात त्यांचा गर्भपात झाला. तसेच महिलेचा पती आणि सासू यांनी वारंवार महिलेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.