Wakad : व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – व्यवसायासाठी आणि गाडी घेण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. तसेच घटस्फोट देण्याची धमकी दिली. ही घटना 18 फेब्रुवारी 2018 ते 11 फेब्रुवारी 2019 या कालावधीत नखाते वस्ती, रहाटणी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

पती जयदीप गायकवाड (वय 30), सासरे अशोक गायकवाड (वय 52), सासू स्वरूप गायकवाड (वय 45), नणंद श्रद्धा गायकवाड (वय 24, सर्व रा. नखाते वस्ती, रहाटणी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 20 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा फेब्रुवारी 2018 मध्ये विवाह झाला. त्यानंतर आरोपींनी तिच्याकडे व्यवसाय करण्यासाठी गाडी घेण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये आणण्याची मागणी केली. विवाहितेने नकार दिल्यामुळे तिला मारहाण करून याबाबत कोणाला काही सांगितल्यास खोट्या केसमध्ये अडकवून माहेरच्यांना जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. को-या स्टॅम्प पेपरवर विवाहितेच्या सह्या घेऊन तिला घरातून हाकलून दिले. तसेच जात पंचायत बसवून घटस्फोट घेण्याची मागणी करत शारीरिक व मानसिक त्रास दिला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मुदळ तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.