Wakad Crime News : धक्कादायक! विवाहितेकडून फ्लॅट, कार आणि 50 हजारांची मागणी

एमपीसी न्यूज – फ्लॅट, चारचाकी गाडी आणि 50 हजार रुपयांची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याची धक्कादायक घटना 19 डिसेंबर 2014 ते 22 ऑगस्ट 2021 या कालावधीत ज्योतिबा नगर, काळेवाडी येथे घडली.

श्रीरंग राजेंद्र खरात (वय 45, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित महिलेने गुरुवारी (दि. 16) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहिता सासरी नांदत असताना आरोपीने घरगुती कारणावरून 50 हजार रुपये, फ्लॅट व चारचाकी गाडीची मागणी केली. मात्र ते देण्यास विवाहितेने नकार दिला असता आरोपीने तिला शिवीगाळ, मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.