Wakad : फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पाच लाख आणण्याची मागणी

पाच जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करून विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कैलासनगर थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी 20 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती राकेश पवार, सासरा युवराज पवार, सासू चित्रलेखा पवार, नणंद रेश्मा गुंड, दीर आकाश पवार (सर्व रा. कैलासनगर, थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित तरुणी सासरी नांदत असताना सासरच्या मंडळींनी तिच्याकडे फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यावरून तिला शिवीगाळ करत मारहाण केली. रात्री अपरात्री घराबाहेर काढून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. यावरून विवाहितेने गुन्हा दाखल केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.