Wakad : पूर्ववैमनस्यातून तिघांना टोळक्याकडून मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने तिघांना लाकडी दांडके, लोखंडी रॉड आणि कोयत्याने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 1) पहाटे दीडच्या सुमारास छत्रपती चौक, वाकड येथे घडली.

शरद राम तांबे (वय 21, रा. काळेवाडी फाटा), विनोद बढे, गोवर्धन वारंगुळे अशी जखमींची नावे आहेत. शरद यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद, त्यांचे मित्र विनोद आणि गोवर्धन यांची छत्रपती चौकाजवळ असलेल्या चौपाटीवर दुकाने आहेत. बुधवारी रात्री दीडच्या सुमारास अनोळखी सहाजण लाकडी दांडके, लोखंडी रॉड आणि कोयते घेऊन आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या रागातून शरद, विनोद आणि गोवर्धन यांच्यावर कोयत्याने वार करत बेदम मारहाण केली. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.