Wakad : बांधकाम साईटवरून डीव्हीआर चोरीस

एमपीसी न्यूज- सॅम्पल फ्लॅटचे कुलूप तोडून बांधकाम साईटवर लावलेला डिव्हीआर चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना वाकड येथे शनिवारी (दि. 5) उघडकीस आली.

रवींद्र वाघू तुपे (वय 42, रा. वडगाव शेरी, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अकरा ते शनिवारी पहाटे पाच वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. फिर्यादी तुपे यांनी वाकड येथील हायलाईफ या बांधकाम साईटवरील सॅम्पल फ्लॅटमध्ये ठेवलेला 15 हजार रुपये किंमतीचा डिव्हीआर चोरट्यांनी चोरून नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.