Wakad : एक्सचेंज ऑर्डर करण्याच्या बहाण्याने तरुणाला 56 हजारांचा गंडा

एमपीसी न्यूज – कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून एक्सचेंज ऑर्डर करण्याच्या बहाण्याने तरुणाला 56 हजार 299 रुपयांचा गंडा घातला. ही घटना 17 एप्रिल 2019 रोजी काळा खडक रोड, वाकड येथे घडली.

प्रवीण सुरेश चांदेकर (वय 30, रा. काळाखडक रोड, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण यांना 17 एप्रिल रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास 09898265567 आणि 6291691810 या क्रमांकावरून फोन आले.

फोनवरील व्यक्तीने कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून एक्सचेंज ऑर्डर करण्याच्या बहाण्याने प्रवीण यांच्याकडून 56 हजार 299 रुपये बँक खात्यावर पाठवून घेतले. प्रवीण यांच्या हा फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.