Wakad : तरुणावर चाकूने वार करत कुटुंबाला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

Family stabbed by youth; Four were charged

एमपीसी न्यूज – घरासमोर बसलेल्या तरुणावर चाकूने वार केले. तसेच त्याच्या कुटुंबाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 24) रात्री साडेदहा वाजता काळेवाडी, वाकड येथे घडली.

फिरोज सय्यद, मोहम्मद शेख, मोहम्मद शेख याची पत्नी (पूर्ण नाव माहिती नाही), सलमान शेख (सर्व रा. काळेवाडी, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

खय्युम अलीम सय्यद (वय 22, काळेवाडी, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सय्यद हे त्यांच्या घरासमोर बसले होते. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या घरासमोर आले. आरोपींनी सय्यद यांच्या आईला आणि भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सय्यद यांच्यावर धारदार हत्याराने वार केले.

यामध्ये सय्यद यांच्या कमरेवर गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपींनी सय्यद यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

चिंचवडमध्ये पती-पत्नीला मारहाण

चिंचवडमध्ये चार जणांनी मिळून पती-पत्नीला दगडांनी, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना 25 मे रोजी दुपारी आनंदनगर झोपडपट्टी चिंचवड येथे घडली. बाळू सादू पालके, आकाश बाळू पालके, महादेव बळीराम मगर (सर्व रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

भास्कर अंबादास गायकवाड (वय 56, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) यांनी याप्रकरणी 25 जून रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.