Wakad: किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी; एकावर वार, परस्पर विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. यात एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या प्रकरणात परस्पर विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ही घटना सोमवारी (दि. 4) रात्री वाकड येथे घडली आहे.

निलेश दिलीप भोईटे (वय 28, रा. पिंपरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रमोद गायकवाड (वय 25), सचिन खलसे, रोहित मोरे (सर्व रा. थेरगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपी प्रमोद याला ‘तू शिवीगाळ का करतो’ असे म्हटले. त्याचा राग मनात धरून आरोपी प्रमोद याने निलेश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी सचिन आणि रोहित यांनी लोखंडी कोयते हातात घेऊन ‘तुला आज सोडणार नाही’ अशी धमकी दिली. याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याच्या परस्पर विरोधात प्रमोद किसन गायकवाड (वय 25) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश शेट्टी, निलेश मोहिते आणि एक अनोळखी इसम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री फिर्यादी प्रमोद हे त्यांचा मित्र रोहित याच्यासोबत दुचाकीवरून औषध आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या जवळ येऊन  शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. आरोपी महेश याने सिमेंटच्या गट्टूने तर आरोपी नीलेश याने धारदार हत्याराने प्रमोद यांच्या हातावर व पायावर वार करून जखमी केले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.