Wakad : पावती केली म्हणून वाहतूक पोलिसा सोबत हुज्जत; एकाला अटक

एमपीसी न्यूज – कारच्या काचांना काळ्या रंगांची फिल्म बसवली तसेच विना लायसन्स कार चालविल्याची पावती करत असताना कार चालकाने वाहतूक पोलिसासोबत हुज्जत घातली. वाहतूक पोलिसाच्या अंगावर धावून येत ‘तुम्हाला काय अधिकार आहे, माझ्यावर पावती करण्याचा’ अशी धमकी दिली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 22) सायंकाळी सहा वाजता रहाटणी फाटा चौक, वाकड येथे घडली.

निलेश जालिंदर बोराडे (वय 32, रा. बोराडेवाडी, मोशी) असे अटक केलेल्या कार चालकाचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक एम एस लोणकर यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस नाईक लोणकर हे सांगवी वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता रहाटणी फाटा चौक, वाकड येथे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी चौकातून एक फॉर्च्युनर कार जात होती. कारच्या काचांना काळ्या रंगाची फिल्म बसवली होती. त्यामुळे वाहतूक पोलीस लोणकर यांनी कार थांबवली. चालकाकडे लायसन्सची मागणी केली.

लायसन्स दाखवण्यास चालकाने नकार दिला. त्यामुळे काचांना लावलेली काळी फिल्म लावणे आणि विना लायसन्स कार चालविल्याची लोणकर यांनी पावती केली. त्यावरून आरोपी कारमधून उतरून लोणकर यांच्या अंगावर धावून आला. ‘तुमचा काय अधिकार आहे, माझ्यावर पावती करण्याचा’ असे म्हणत लोणकर यांच्याशी बाचाबाची केली. फिर्यादी वाहतूक पोलीस लोणकर यांच्यासोबत असलेले ट्राफिक वॉर्डन भागवत दशरथ वळू यांना अडवून आरोपीने सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III