Wakad : एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईतांना अटक; वाकड पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – काळेवाडी चौकातील पेट्रोल पंपावरील एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या पाचही जणांवर चोरी, घरफोडी, मारामारी, बेकायदेेशीर हत्यार बाळगणे, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वाकड पोलिसांच्या या कारवाईमुळे वाकड, कोथरूड, श्रीरामपूर आणि भूम पोलिस ठाण्यातील एकूण सोळा गुन्हे उघडकीस आले आहेत.

दुर्गेश बापू शिंदे (वय 32, रा. वाकड, मूळ रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर), प्रमोद संजय सवणे (वय 29, रा. अष्टविनायक कॉलनी, वाकड), भैया ऊर्फ सचिन बबन जानकर (वय 26, रा. अण्णाभाऊ साठे नगर, वाकड), नाना ऊर्फ सचिन रामचंद्र शिंदे (वय 32, रा. क्षितिज कॉलनी, वाकड), रामकृष्ण सोमनाथ सानप (वय 30, रा. सद्गुरू कॉलनी, वाकड. मूळ रा. रामेश्वर वस्ती, ता. भूम, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्या पाच जणांची नावे आहेत.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी प्रमोद कदम यांना माहिती मिळाली की, काहीजण काळेवाडी चौकातील पेट्रोल पंपावरील एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्याकडे कार आणि घातक हत्यारे आहेत. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन लोखंडी पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, लोखंडी कोयता, मिरची पावडर, नायलॉन रस्सी, स्टील रॉड, पाच मोबाईल फोन आणि एक स्विफ्ट कार (एमएच 14 / सी के 1161) असा ऐवज मिळाला. यावरून पाच जणांना अटक करण्यात आली.

अटक केलेल्या आरोपींपैकी दुर्गेश शिंदे हा श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्याच्यावर 2011 पासून जबरी चोरी, घरफोडी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यांसारखे नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. भैया जानकर याच्यावर 2015 पासून वाकड पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत, विनयभंग, दंगा यांसाखरे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत.

  • नाना शिंदे याच्यावर कोथरूड आणि वाकड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. रामकृष्ण सानप याच्यावर भूम आणि वाकड पोलीस ठाण्यात दोन आणि प्रमोद सवने याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याची नोंद आहे. वाकड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे वाकड, कोथरूड, भूम आणि श्रीरामपूर या चार पोलीस ठाण्यातील 16 गुन्ह्यांची उकल झाली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी विक्रम जगदाळे, नितीन ढोरजे, प्रमोद कदम, भैरोबा यादव, विजय गंभीरे, दीपक भोसले, शाम बाबा, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, सुरेश भोसले, सुरज सुतार, प्रशांत गिलबिले, जावेद पठाण, रमेश गायकवाड यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.