Wakad: अन्न व औषध प्रशासन विभागाकडून थेरगावमधून एक लाखाचा गुटखा जप्त

Wakad: Food and Drug Administration seizes one lakh gutka from Thergaon अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती मिळाली की, थेरगाव येथील बोराडेनगर येथे बेकायदेशीररीत्या प्रतिबंधित गुटखा विक्री केली जात आहे. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने पोलिसांसोबत मिळून कारवाई केली.

एमपीसी न्यूज- थेरगाव येथून एक लाख 11 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने केली आहे. पोलिसांनी याबाबत एकाला अटक केली आहे.

अजमत सलीम पठाण (वय 31, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी अरुण श्रीराम धुळे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महराष्ट्र राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित, स्वादिष्ट सुपारी, तंबाखूजन्य पदार्थ साठवणूक, वितरण, वाहतूक यावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महाराष्ट्राचे अन्न सुरक्षा आयुक्त यांनी दिले आहेत.

अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती मिळाली की, थेरगाव येथील बोराडेनगर येथे बेकायदेशीररीत्या प्रतिबंधित गुटखा विक्री केली जात आहे. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने पोलिसांसोबत मिळून कारवाई केली.

पठाण याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख 11 हजार 56 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.