BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : किरकोळ कारणावरून तरुणाचे डोके फोडले

एमपीसी न्यूज – वडिलांना आणि चुलत यांना शिवीगाळ केल्याचा विचारल्यावरून एकाने तरुणाचे डोके फोडले. ही घटना मंगळवारी (दि. 10) रात्री वाकड रोड येथे घडली.

किरण गंगाराम जोगदंड (वय 18, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमोल साहेबराव गायकवाड (रा. वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी किरण त्यांच्यात दोन भावांसोबत घराकडे जात होते. वाकड रोड येथील आयवाना सोसायटी समोर आले असता त्यांनी आरोपी अमोल याने त्यांच्या वडिलांना आणि चुलते यांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारला.

यावरून आरोपी अमोल याने किरण यांच्या डोक्यात स्टीलचा पाईप मारून जखमी केले. तसेच बघून घेतो, अशी धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलिस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3