Wakad : किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण करणाऱ्या चौघांना अटक

Four arrested for beating a youth for petty reasons :किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण करणाऱ्या चौघांना अटक

एमपीसी न्यूज – घरासमोरून जाणाऱ्या तरुणाकडे पाहणाऱ्या एकाला तरुणाने ‘माझ्याकडे का बघतोस’ असे विचारले. त्यावरून चार जणांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 30) रात्री पावणे नऊच्या सुमारास थेरगाव येथे घडली. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

आकाश युवराज पवार, राकेश युवराज पवार (वय 28), स्वप्नील उर्फ अनिल अशोक म्हस्के (वय 23, तिघे रा. थेरगाव), आकाश पवार याचा दाजी लक्ष्मीकांत गुंड (पत्ता माहिती नाही) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी अनिकेत नरसिंग कांबळे (वय 20, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास फिर्यादी कांबळे हे आरोपी आकाश पवार याच्या घरासमोरून जात होते. त्यावेळी आकाश हा कांबळे यांच्याकडे पाहत होता. त्यामुळे कांबळे यांनी आकाश याला ‘तू माझ्याकडे काय बघतोस’ अशी विचारणा केली.

यावरून आकाश याने शिवीगाळ करून कांबळे यांना हाताने मारले. त्यानंतर आरोपी लक्ष्मीकांत याने लोखंडी रॉडने कांबळे यांच्या दोन्ही हातावर, पायावर मारून जखमी केले. तसेच सर्व आरोपींनी कांबळे यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like