Wakad : अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या चार जणांना अटक; ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Four arrested for smuggling gutka; 56 lakh confiscated

एमपीसी न्यूज – ताथवडे येथे एका टेम्पोमध्ये व इनोव्हा कारमध्ये अवैद्य गुटखा वाहतूक करणाऱ्या चार जणांना वाकड पोलीसांनी सापळा रचून अटक केली. या कारवाईत आयशर टेम्पो, इनोव्हा कार व गुटख्यासह तब्बल 56 लाख 02 हजार 500 रुपयांचा मुद्दमाल जप्त करण्यात आला आहे.

जनार्दन शंभु भारती (वय.28, रा. चकाळा अंधेरी, सिगारेट फॅक्टरी, बावनपाडा, मुंबई ) सुनिलकुमार गौरीशंकर तिवारी (वय.37 रा. इंदिरानगर भाजी मार्केट, गणेश गल्ली झोपडपट्टी, ठाणे वेस्ट, ठाणे) जियारुलखान रशिद खान समा (वय.32 रा. शिपटींग चाळ, दिल्ली दरबार हॉटेलसमोर मिरागांव, मिरा रोड, ठाणे) धरमशंकर दुर्गाचरण गुप्ता (वय.36 रा. डॉन बॉस्को स्कुल, तिलकनगर, बोरीवली वेस्ट, मुंबई) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

या आरोपींकडून आयशर टेम्पो (एमएच 02 ईआर 3893) व इनोव्हा कार (एमएच 47 के 2736) मुद्देमालासह जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे कर्मचारी गस्त घालत असताना कर्मचारी सचिन नरुटे यांना ताथवडे येथे टेम्पो व इनोव्हा कारमध्ये अवैद्य गुटखा वाहतूक होत असल्याबाबत बातमी मिळाली.

त्या आधारे तपास पथकाचे अधिकारी व कर्मचा-यांनी ताथवडे येथील हॉटेल स्टे इन समोर सापळा लावला. त्यावेळी संशयीत आयशर टेम्पो व एक इनोव्हा कार मिळून आली.

या संशयित गाड्यांची तपासणी केली असता आयशर टेम्पोत 29 गुटख्याची पोती तर इनोव्हा कार मध्ये 1 पोते असा एकूण 38 लाख 02 हजार 500 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला.

वाकड पोलीसांनी अन्न व औषध प्रशासन सुरक्षा अधिकारी यांना बोलावून ताब्यात घेतलेल्या चार आरोपींवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच गुटख्यासह गुन्हयात वापरण्यात आलेला आयशर टेम्पो व इनोव्हा कार असा तब्बल 56 लाख 02 हजार 500 रुपयांचा मुद्दमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदिप विष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ दोनचे पोलीस उप आयुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक विवेक मुगळीकर, हरिश माने, सिद्धनाथ बाबर व तपास पथकातील पोलीस कर्मचारी विजय गंभीरे, विक्रम कुदळ, सचिन नरुटे, प्रशांत गिलबिले, विक्रम जगदाळे, बापुसाहेब धुमाळ, बाबाजान इनामदार, जावेद पठाण, प्रमोद कदम, दिपक भोसले, शाम बाबा, तात्या शिंदे, नितीन गेंगजे व अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी ए. एस, गवते, ए. एस. धुळे. आर. आर. काकडे यांनी मिळून केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.