Wakad : किरकोळ कारणावरून चार जणांना लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून चार तरुणांना चौघांनी लोखंडी रॉड व सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री रहाटणी फाटा येथे घडली.
संतोष वसंत खलसे, प्रतीक पवार, विशाल बाबर (सर्व रा. थेरगाव) आणि त्यांचा एक मित्र (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

हुसेन नबीसाब शेख (वय 26, रा. पाचपीर चौक, काळेवाडी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हुसेन आणि त्यांचे मित्र किरण शेळके, विनोद भवार, जितेंद्र देवरे हे एका हॉटेलमध्ये जेवण करून पायी चालले होते. त्यावेळी तिथे आलेल्या तोंडओळखीच्या आरोपींनी तू काऊंटरवर आमच्या मित्राला धक्‍का का मारला, अशी विचारणा करीत फिर्यादी यांना त्यांच्या चार मित्रांना लोखंडी रॉड आणि सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. या घटनेत हुसेन हे गंभीर जखमी झाले आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'86be07ae4e279c5a',t:'MTcxMTY5NjEyMi40MzUwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();