Wakad fraud : टुरिस्ट पॅकेज देतो म्हणत केली 11 जणांची फसवणूक

एमपीसी न्यूज : टुरिस्ट पॅकेज देतो म्हणत 11 जणांची (Wakad fraud) 5.45 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. एका महिलेने याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी सुनिल सरोदे, वय 35 वर्षे अंदाजे, रा. चिंचवडेनगर, वय 35 वर्षे अंदाजे, रा. फलटण, आशिष, वय 37 वर्षे अंदाजे, रा. विमाननगर, रवी गुप्ता, वय 34 वर्षे, शैलेंद्र गायकवाड, या आरोपींच्या विरोधात भा.द.वि कलम 420, 406, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC News : “जल्लोष शिक्षणाचा 2022” उपक्रमाला सुरुवात

हा गुन्हा 1 मे 2022 ते 8 मे 2022 रोजी 12 वा च्या दरम्यान द हब, तिसरा मजला, डांगे चौक थेरगाव येथे घडला आहे.आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना टुरिस्ट पॅकेज देतो,(Wakad Fraud) असे खोटे आश्वासन देऊन फिर्यादी यांना पैसे भरण्यास भाग पाडून कोणतीही सेवा न देता फिर्यादी यांची 55,000 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.

तसेच फिर्यादी हे पोलीस स्टेशन येथे आल्यावर समजले की, त्यांच्यासारखी इतर 10 लोकांची एकूण 4.90 लाख रुपयांची  फसवणूक केली आहे. तसेच आणखी बऱ्याच लोकांना या आरोपींनी गंडा घातला असल्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.