Wakad: पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगत तरुणीला ब्लॅकमेल करत 8 हजार रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज –  पोलीस उप निरीक्षकाचा फोटो वापरून पोलीस असल्याचे(Wakad) भासवून तरुणीचा विश्वास संपादन करुन पुढे तिला ब्लॅकमेल करत 8 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हा सारा प्रकार 4 जानेवारी  2024 रोजी वाकड येथे ऑनलाईन पद्धतीने घडला आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी (दि.1) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून शुभम राठोड (वय 30 रा. चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने psi-shubham.rathod या (Wakad)इंस्टाग्राम खात्यावर पोलीस कर्मचाऱ्याचा फोटो वापरलं याद्वारे पीडित तरुणीशी संपर्क साधून  व्हॉटसअप द्वारे बोलणे वाढवले. लग्नाचे आमिष दाखवून फिर्याडीला त्यांचे फोटो मागवून घेतले.
त्यानंतर आरोपीने फिर्यादीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून वेळोवेळी असे 8 हजार 800 रुपये घेतले व धमकी दिली. यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.