Wakad : कुरियर डी ऍक्टिव्हेट झाल्याचे सांगून 1.44 लाख रुपयांची केली फसवणूक

एमपीसी न्यूज : कुरियर डी ऍक्टिव्हेट (Wakad) झाल्याचे सांगून 1.44 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत 34 वर्षीय पीडित महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अनोळखी इसमाविरोधात भा.द.वि कलम 406, 419, 420 सह कलम 66 (क) (ड ) आय.टी. ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
11 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी अनोळखी मोबाईल धारकांनी मोबाईलवरून फिर्यादीला सांगितले. डीटीडीसी कुरियर  कंपनीतून बोलत असल्याचे खोटे सांगून त्यांनी खरेदी केलेल्या कुरियरसंबंधी सर्व माहिती दिली व त्यांचे कुरिअर डी  ऍक्टिव्हेट झाले आहे. गोडाऊनमध्ये अडकले असल्याच्या खोटे सांगितले.

त्यासाठी फिर्यादीला लिंक पाठवून लिंकवर क्लिक करण्यास (Wakad) सांगितले व तसे केल्यानंतर त्यांच्या स्टॅंडर्ड चार्टर्ड बँक वरून 45,000 रुपये व एसबीआय बँकेच्या खात्यावरून 99,999 रुपये असे एकूण 1,44,999 ऑनलाइन पद्धतीने कट करून घेऊन त्यांची ऑनलाइन फसवणूक केली व ती रक्कम तात्काळ फेडरल बँक व त्यामधून एचडीएफसी बँक खात्यात ट्रान्सफर करून सदर रकमेचा आभार केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.