Wakad : बनावट पॅनकार्डच्या आधारे क्रेडीट कार्ड घेऊन पाच लाखांची फसवणूक

हा प्रकार सप्टेंबर 2019 पासून 6 डिसेंबर 2019 या कालावधीत घडला. : Fraud of Rs 5 lakh by taking credit card on the basis of fake PAN card

एमपीसी न्यूज – दुसऱ्याच्या नावे बनावट पॅनकार्ड तयार करून त्याचा वापर करून क्रेडीट कार्ड घेतले. क्रेडीट कार्डचा वापर करून चक्क पाच लाख रुपयांची खरेदी करून फसवणूक केली. हा प्रकार सप्टेंबर 2019 पासून 6 डिसेंबर 2019 या कालावधीत घडला.

लोकेशकुमार महेशकुमार दिमोले (वय 40, रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने फिर्यादी लोकेशकुमार यांच्या नावाने बनावट पॅनकार्ड तयार केले. त्याचा वापर करून आरोपीने स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडीट कार्ड मिळवले. कार्डचा वापर करून अज्ञात आरोपीने पाच लाख रुपयांची खरेदी केली.

खरेदी केल्यानंतर क्रेडीट कार्डची बिले फिर्यादी लोकेशकुमार यांच्या नावाने येऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत त्यांनी पोलिसात धाव घेऊन गुन्हा नोंदवला.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.