Wakad fraud : सराफाला खोटे सोने विकून 30 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज : सराफाला खोटे सोने विकून 30 हजारांची फसवणूक केली.(Wakad fraud)ही घटना 16 सप्टेंबर रोजी रात्री शिवनेरी ज्वेलर्स, वाकड येथे घडली.

राजकिरण पोपट पाटील (वय 40, रा. वाकड) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 25) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिला (रा. गजानन महाराज मंदिर मठ, आळंदी), सुरज पांडुरंग निरपाल (वय 22, रा. औसा रोड, लातूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Earn and learn scheme : विद्यार्थी साहाय्यक समितीच्या ‘कमवा व शिका’ योजनेसाठी सहकार्याचे आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या दुकानात ग्राहक बनून आले. आरोपी महिलेने व्यंकटेश ज्वेलर्स लातूर या दुकानातून सोने खरेदी केल्याची पावती दाखवली आणि 10 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार देऊन मुलाच्या उपचारासाठी तातडीने पैसे पाहिजे असे कारण (Wakad fraud) सांगत फिर्यादीकडून 30 हजार रुपये घेतले. महिलेने दिलेला हार हा सोन्याचा नसून नकली आहे, हे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.