Wakad : दारू आणण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणावर वार

एमपीसी न्यूज – दारू आणण्यास नकार दिल्याने तरुणाला तिघांनी मिळून मारहाण केली. त्याचा राग मनात धरून तिघांनी दुस-या तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री दहाच्या सुमारास गजानन चौक, रहाटणी येथे घडली.

प्रशांत खराडे (वय 26, रा. रहाटणी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांतचा मावसभाऊ प्रदीप श्रीमंत गोडगिरे (वय 27) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बापू सातपुते आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II
  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी चारच्या सुमारास प्रशांत आणि त्याचा मित्र सुमित जोशी गजानन कॉलनी येथील मोकळ्या मैदानात बसले होते. त्यावेळी बापू आणि त्याचे दोन साथीदारांनी सुमितला दारू आणण्यास सांगितले. सुमितने दारू आणण्यासाठी नकार दिला. यावरून बापूने सुमितला हाताने मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

रात्री दहाच्या सुमारास गजानन चौक येथे बापू आणि त्याच्या दोन साथीदारांनी प्रशांत याच्या डोक्यात, मानेवर, पाठीवर आणि पायावर सपासप वार केले. यामध्ये प्रशांत गंभीर जखमी झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.