Wakad gold fraud : महिलेची 30 तोळे सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक

एमपीसी न्यूज : एका महिलेची 30 तोळे सोन्याच्या दागिन्यांची (Wakad gold fraud) फसवणूक करण्यात आली आहे. पीडित महिलेने याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

समीर पाठक, श्रद्धा पाठक व श्रेया पाठक, सर्व रा. गणेशनगर, वाकड या आरोपी विरोधात भा.द.वि कलम 420, 406, 120 (ब), 506, 34 अन्वे पुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना जानेवारी 2017 ते 28 सप्टेंबर, 2022 पर्यंत घडली आहे. फिर्यादी या गृहिणी असून त्यांचे आरोपी श्रद्धा पाठक हिच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यातून त्यांचे इतर आरोपींशी पारिवारिक संबंध निर्माण झाले.(Wakad gold fraud) त्याचा फायदा घेऊन सर्व आरोपींनी वेळोवेळी फिर्यादी महिलेस चेकने व ऑनलाईन असे 5.64 लाख रुपये तसेच बाहेरून व्याजाने 4 लाख रुपये घेऊन आरोपींना देण्यास भाग पाडले.

Savitribai Phule University: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘डिग्री प्लस’ साठी नावनोंदणी करण्याचे आवाहन

फिर्यादीने आरोपींकडे विश्वासाने दिलेली 10 तोळे सोन्याचे गंठण तसेच आरोपींनी एकत्रित कट रचून फिर्यादी  सर्व दागिने आमच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी द्या असे सांगून या महिलेकडून सुमारे 20 तोळे वजनाचे दागिने देण्यास भाग पाडले.(Wakad gold fraud) असे एकूण 30 तोळे वजनाचे दागिने फिर्यादीने आरोपींना विश्वासाने सुपूर्त केले असता परस्पर फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवून त्यावर कर्ज काढले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.