Wakad : भरदिवसा घरफोडी करून दागिन्यांसह गॅस सिलेंडर चोरीला

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – भर दिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने आणि गॅस सिलेंडर असा एकूण 44 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना साई ज्योत पार्क, नखाते वस्ती, रहाटणी येथे शुक्रवारी (दि. 27) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली आहे.

नताशा सचिन शिवशरणे (वय 26, रा. साई ज्योत पार्क, नखाते वस्ती, रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नताशा मजुरीचे काम करतात. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्या घर बंद करून कामासाठी गेल्या. त्यानंतर अज्ञात चोरट्याने घरफोडी करून घरातून साडेसतरा ग्रॅमचे सोन्याचे दागिने आणि गॅस सिलेंडर असा एकूण 44 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.