Wakad : जांबेमध्ये सुमारे 50 लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर विक्री करण्यासाठी गुटखा व पानमसाल्याचा साठा केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 49 लाख 75 हजार 500 रुपयांचा गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जांबे येथे मंगळवारी (दि. 14) साडेबाराच्या सुमारास करण्यात आली.

महेंद्रकुमार नथुलाल राठोड (वय 35, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक संतोष शामराव सावंत (वय 33, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांबे येथे मंगळवारी पत्राशेडमध्ये 49 लाख 75 हजार 500 रुपयांचा गुटखा व पानमसाला आढळून आला. त्याच्या खरेदीचे बिल किंवा माहिती आरोपी राठोड याच्याकडे नव्हती. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोप राठोड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.