Wakad : वाकड येथून एक लाख किंमतीचा गुटखा जप्त; गुन्हे शाखा युनिट 4 ची कारवाई

Gutka worth Rs one lakh seized from Wakad; Action of Crime Branch Unit 4

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 4 च्या वतीने थेरगाव येथील भोर्डे नगर येथिल एका इसमाच्या राहत्या घरी छापा टाकून सुमारे 1 लाख 11 हजार 56 रुपये किंमतीचा गुटखा व तंबाखु सदृश्य पदार्थाचा साठा जप्त केला.

अन्न व औषध प्रशासन विभागाकडून आरोपी अजमत सलीम पठाण ( रा. सर्व्हे नंबर- 1246 भोर्डे नगर, थेरगाव, पिंपरी चिंचवड़) याच्या विरोधात वाकड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हे शाखा युनिट 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिदे यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक देशमुख व इतर पोलिस कर्मचारी वाकड पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते.

_MPC_DIR_MPU_II

त्यावेळेची आरोपी पठाण याने त्याच्या राहत्या घरात पान मसाला व सुगंधीत तंबाखुचा विक्रीकरिता साठा केला असल्याची माहीती मिळाली.

पोलिसांनी तेथे छापा टाकला असता आरोपी पठाण याच्या घरात गुटखा व तंबाखु सदृश पदार्थाचा मोठा साठा मिळुन आला. सहायक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन विभाग, औध पुणे यांना याबाबत माहिती दिल्यावर तेथील अन्न व सुरक्षा अधिकारी एएस धुळे यांनी या ठिकाणी जाऊन 1 लाख 11 हजार 56 रुपये किंमतीचा गुटखा व तंबाखु सदृश पदार्थाचा साठा जप्त केला.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप विष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त राजाराम पाटील, (गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट-4 चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अबरिष देशमुख, हवालदार नारायण जाधव, संजय गवारे, प्रविण दळे, धर्मराज आवटे, अदिनाथ मिसाळ, संतोष असवले, लक्ष्मण अहारी, मोहम्मद नदाफ, तुषार शेटे, वासुदेव मुढे, शावरसिध्द पांढरे, प्रशांत सैद, अजिनाथ ओबासे, धनाजी शिंदे, तुषार काळे, सुखदेव गादंडे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.