Wakad: थेरगावमध्ये पावणेतीन लाखांचा गुटखा जप्त;एकाला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीपणे गुटख्याची वाहतूक करणार्‍याकडून पावणेतीन लाखांचा गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ अन्न व औषध प्रशासनाने थेरगाव येथे शुक्रवारी जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

करीम युनुस तांबोळी (वय 46, रा. पवारनगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अरूण श्रीराम धुळे (वय 57) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तांबोळी हा बेकायदेशीरपणे गुटखा विक्रीसाठी घेऊन जात होता. याची अन्न व औषध प्रशासनाला माहिती मिळाली. त्यानुसार थेरगावातील डांगे चौकातून आरोपीला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून 2 लाख 82 हजार 340 रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून त्याला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक सपना देवतळे अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.