Wakad : हेडफोन खरेदी करण्यावरून वाद; मोबाईल शॉपीची तोडफोड

एमपीसी न्यूज – ग्राहक हेडफोनचे पैसे न देता हेडफोन घेऊन जात होता. यावरून दुकानदार आणि ग्राहक यांच्यामध्ये वाद झाला. या वादात ग्राहकाने दुकानातील पितळेची धूपदानी दुकानदाराला फेकून मारली. तसेच दुकानाची तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि. 2) सायंकाळी साडेसातच्या सुमारास रहाटणी येथील चारभुज मोबाईल शॉपी या दुकानात घडली.

दीपाराम नथाराम राठोड (वय 34, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महेश सावंत (रा. थेरगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड यांचे रहाटणी येथे चारभुजा मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास महेश हेडफोन खरेदी करण्यासाठी राठोड यांच्या दुकानात गेला. महेशने दुकानातून हेडफोन खरेदी केले आणि पैसे न देता निघून जात होता. त्यावेळी राठोड आणि महेश यांच्यामध्ये वाद झाला. या वादातून महेश याने दुकानातील पितळ्याची धूपदाणी राठोड यांना फेकून मारली.

तसेच दुकानाच्या काउंटरवरील काचा फोडून नुकसान केले. राठोड यांना मारहाण करून जात असताना दुकानातील कामगारांनी महेशला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महेशने दुकानातील कामगारांना देखील शिवीगाळ करत हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1