Wakad News : वाकड – हिंजवडीची म्हातोबा यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द 

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे वाकड – हिंजवडीची म्हातोबा यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. चैत्र पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीला श्री म्हातोबा देवस्थानची यात्रा व प्रसिद्ध बगाड मिरवणूक निघते मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला आहे. 

कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी म्हातोबाच्या चरणी प्रार्थना करणार असल्याचे ग्रामस्थ व यात्रा कमिटीने म्हंटले आहे. तीन दिवसांच्या उत्सवासाठी महाराजांचे मूळ ठाणे असलेल्या बारपे आडगावच्या घनदाट जंगलात पायी जाऊन शेलेकरी बगाडाचे लाकूड आणतात.

त्यानंतर बगाड मिरवणूक, वाकडला काट्याची पालखी मिरवणूक, देवाचा छबिना निघतो. दोनही गावात लोकनाट्य तमाशा, ऑर्केस्ट्रा, संगीत रजनी असे कार्यक्रम असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.