Wakad : मोक्काची कारवाई केलेल्या सराईत आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या सराईत आरोपीला वाकड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. रविवारी (दि. 17) वाकडमधील भूमकर चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली.

राज भारत लोखंडे (वय 23, रा.श्रीनगर, रहाटणी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

मोक्कामधील एक सराईत गुन्हेगार वाकड भूमकर चौक येथील जिंजर हॉटेलजवळ थांबला असल्याची माहिती पोलीस हवालदार कन्हेरकर यांना मिळाली. त्यानुसार वाकड पोलिसांनी सापळा रचून संशयास्पदरित्या थांबलेल्या लोखंडेला ताब्यात घेतले. त्याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात हत्यार बाळगणे आणि खुनाच्या प्रयत्नाचा तसेच हिंजवडी व निगडी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर वाकड पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली असून तो फरार होता. त्याला पुढील तपासासाठी हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजन, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी कन्हेरकर, जगदाळे, गंभीरे, कुदळ, चव्हाण यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.