Wakad : संचारबंदीतही घरफोड्यांचे सत्र सुरूच; वाकडमध्ये दहा हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज – संचारबंदी सुरू असतानाही घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. वाकड परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दहा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना 16 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली आहे.

बाळू बाबा उबाळे (वय 64, रा. रत्नदीप कॉलनी, जय भवानी चौक, रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उबाळे यांचे घर 15 एप्रिल रोजी रात्री साडेअकरा ते 16 एप्रिल सकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान कुलूप लावून बंद होते. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप आणि कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून दहा हजार रुपये वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.