Wakad : बेकायदा जमाव जमवून तरुणाला मारहाण; आठ जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पेट्रोल संपल्याने दुचाकी ढकलत नेत असलेल्या तरुणाला आठ जणांच्या टोळक्याने बेकायदा जमाव जमवून कोयत्याने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 13) रात्री नऊच्या सुमारास काळेवाडी-चिंचवड पुलाजवळ घडली.

प्रथमेश गोकुळ पवार (वय 18, रा. बुधवार पेठ, पुणे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रसल गौड, सुरज परदेशी, अमोल खेडेकर, शंकर परदेशी आणि अन्य चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री फिर्यादी प्रथेमष मोपेड दुचाकीवरून काळेवाडी-चिंचवड पुलावरून जात होता. पुलाजवळ त्याच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. त्यामुळे तो दुचाकी ढकलत नेत होता. त्यावेळी आरोपींनी बेकायदा जमाव जमवून प्रथमेश यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले. तसेच दुचाकी चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.