Wakad : पूर्ववैमनस्यातून नातेवाईकांमध्ये हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी झाली. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास काळाखडक, वाकड येथे घडली.

नारायण वसंत यादव (वय 36, रा. मुंजोबानगर, काळाखडक वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी यांच्या मामाची मुले आकाश कुमार पवार, उमेश कुमार पवार (दोघेही रा. वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी, त्यांचे भाऊ असे घराबाहेर उभे होते. सकाळी फिर्यादी यांच्या आईशी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी, त्यांची आई व पत्नी यांना लाकडी दांडक्‍याने मारहाण केली.

याच्या परस्परविरोधात उमेश कुमार पवार (वय 21, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भाऊसाहेब वसंत यादव, नारायण वसंत यादव (दोघेही रा. वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी आपसांत संगनमत करून लोखंडी रॉड, बिअरची बाटली आणि लाकडी दांडक्‍याने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.