Wakad : थेरगावमधून जेसीबी मशीन पळविली; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेली जेसीबी मशीन चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 9) सकाळी थेरगाव येथे उघडकीस आली आहे.

रवी नारायण मोतीराम (वय 29, रा. अशियान सोसायटी, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोतीराम यांनी शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्यांचा पाच लाख रुपये किंमतीचा एम एच 14 / सी जी 0695 हा वेंगस्कर स्टेडिअम समोर सार्वजनिक रस्त्यावर पार्क केला होता. अज्ञात चोरट्यांनी तो चोरून नेला. रविवारी सकाळी ही बाब उघडकीस आली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.