Wakad : ब्युटी पार्लरमधून लॅपटॉप आणि रोकडची चोरी

पोलिसांनी पंकज हरिप्रसाद बाजुळगे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. : Laptops and cash stolen from beauty parlor

एमपीसी न्यूज – ब्यूटी पार्लरमधून चोरट्याने लॅपटॉप आणि रोकड असा एकूण 50 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना मंगळवारी (दि. 18) सकाळी जगताप डेअरी चौकात कॅस्टल ब्युटी सेंटर येथे उघडकीस आली.

सीमा दीपक धोत्रे (वय 35, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पंकज हरिप्रसाद बाजुळगे (वय 21, रा. रहाटणी, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सीमा यांचे जगताप डेअरी चौकाजवळ फाईव्ह सोसायटीमध्ये कॅस्टल ब्युटी सेंटर आहे. सीमा यांनी त्यांचे ब्युटी सेंटर सोमवारी रात्री साडेआठ वाजता कुलूप लाऊन बंद केले.

त्यानंतर रात्री आरोपी पंकज याने दुकानाचे लॉक तोडून दुकानात प्रवेश करून एक लॅपटॉप आणि रोख रक्कम असा एकूण 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

हा प्रकार मंगळवारी सकाळी अकरा वाजता उघडकीस आला. पोलिसांनी आरोपी पंकज याला अटक केली आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.