Wakad : कस्पटेवस्ती येथे घरफोडी करून 50 हजारांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – कार्यक्रमासाठी गोव्याला गेलेल्या घरात चोरट्यांनी चोरी करून 50 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना 21 ते 25 नोव्हेंबर 2019 या कालावधीत अनमोल रेसिडेन्सी, कस्पटे वस्ती, वाकड येथे घडली.

स्मिता प्रकाश मारपकवार (वय 40, रा. रो हाऊस नंबर डी 24, अनमोल रेसिडेन्सी, कस्पटेवस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्मिता 21 नोव्हेंबर रोजी पहाटे पावणेसहाच्या सुमारास कार्यक्रमासाठी त्यांच्या मावस भावासोबत गोव्याला गेल्या. दरम्यान त्यांचे रो हाऊस कुलूप लावून बंद होते.

अज्ञात चोरट्याने घराचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातून 50 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे 16 ग्रॅम वजनाचे दागिने चोरून नेले. 25 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता स्मिता परत आल्या असता हा प्रकार उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like