Wakad : पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरून घरात घुसून तरुणाला लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच दगड मारून दुचाकीचे नुकसान केले. हा प्रकार सोमवारी (दि. 3) रात्री साडेअकराच्या सुमारास थेरगाव येथे घडला.

अक्षय विलास खंदारे (वय 23, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नाना महादेव सोनवणे (रा. पवारनगर, थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे कावेरीनगर भाजी मंडई येथे गोळे आहेत. फिर्यादी यांची मावशी नागू राजू व्हटकर यांच्याशी भाजीविक्रीवरून त्यांचे जुने वाद आहेत. त्याबाबत फिर्यादी अक्षय यांनी आरोपी सोनवणे याच्याकडे विचारणा केली. त्यामुळे आरोपीला राग आला.

तसेच आरोपी विरोधात यापूर्वी पोलिसांत तक्रार केल्याचा राग मनात धरून आरोपी सोनवणे याने फिर्यादी अक्षय यांच्या घरात घुसून त्यांना हाताने आणि लाथाबुक्क्याने मारहाण केली. फिर्यादीची आई आणि इतर काही जण भांडणे सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांच्या घराबाहेरील दुचाकीवर दगड मारून नुकसान केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.