Wakad : विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे 2015 ते डिसेंबर 2019 दरम्यान वाकड येथे घडला.

याप्रकरणी 31 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सिद्धेश आनंद कर्वे (वय 36), सासू संध्या आनंद कर्वे (वय 58), नणंद अदिती अमोल सोमण (वय 32), अमोल हेमंत सोमण (सर्व रा. कर्वेनगर, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून घरातील किरकोळ कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानिसक छळ केला. तसेच, वेळोवेळी शिवीगाळ करीत मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.