Wakad : अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी सुतारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घरी सुतारकाम करण्यासाठी आलेल्या तरुणाने दहा वर्षीय मुलीचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 16) दुपारी वाकड येथे घडली.

सहिराम (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 37 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सहिराम हा फिर्यादी महिलेच्या घरी रविवारी दुपारी सुतारकाम करण्यासाठी आला होता. त्यावेळी बाथरूमची आतील कडी कशी लावायची?, या बहाण्याने आरोपीने फिर्यादी यांच्या दहा वर्षीय मुलीला आत बाथरूममध्ये नेले. तिथे त्याने मुलीचा विनयभंग केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.