BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : विनयभंग प्रकरणी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 2) सायंकाळी साडेचारच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली.

या प्रकरणी 33 वर्षीय विवाहित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब पाराजी होडगर (वय 42, रा. केशवनगर, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पिंपळे सौदागर येथे थांबल्या असताना आरोपी होडगर याने त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करीत त्यांचा विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक व्ही. डी. मडके करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.