Wakad: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरूणाला अटक

एमपीसी न्यूज – ‘तू माझ्याशी बोलली नाही तर तुझ्याकडे बघून घेईन’ अशी धमकी देत तरूणाने अल्पवयीन मुलीचा रस्त्यात हात धरून शिवीगाळ करत विनयभंग केला. हा प्रकार गुरूवारी सायंकाळी सहा वाजता रहाटणी येथे घडला.

याप्रकरणी विकास कांबळे (वय 20, रा. पिंपळेसौदागर) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी गुरूवारी सायंकाळी शाळेतून घरी येत होती. कुंजीर मंदिरासमोर आरोपीने मुलीचा हात धरला. तू माझ्याशी बोलली नाही तर तुझ्याकडे बघून घेईन अशी धमकी देत आरोपीने तिला शिवीगाळ करत विनयभंग केला. तसेच मोटारीने तिचा पाठलाग केला. वाकड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.