Wakad : अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमपीसी न्यूज – आठ वर्षांच्या चिमुरडीवर एका इसमाने अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार केला. ही घटना 5 ते 15 जून 2019 या कालावधीत काळेवाडी येथे घडली.

व्यंकटेश स्वामी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या 26 वर्षीय आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित मुलीच्या घरासमोर भाड्याच्या खोलीत राहतो. 5 ते 15 जून या कालावधीत आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला त्याच्या खोलीत नेले. तिला त्याच्या मोबाईलवरून अश्लील व्हिडिओ दाखवले आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी शाळा सुरु झाल्यानंतर शाळेत न गेल्याने शिक्षकांनी पालकांकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. एका सामाजिक संघटनेच्या पदाधिका-यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांना धीर देत गुन्हा नोंदवला. आरोपीने घटनेनंतर पळ काढला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.