BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : घटस्फोटानंतर पतीकडून पत्नीचा विनयभंग

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- घटस्फोट झाल्यानंतर पतीने पत्नीच्या मोबाईल फोनवर अश्लील मेसेज पाठवले. तसेच महिलेचा रस्ता अडवून तिच्याशी दमदाटी करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. याबाबत पत्नीने तिच्या घटस्फोटीत पतीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वाकड येथे 30 सप्टेंबर 2018 ते 8 फेब्रुवारी 2019 या कालावधीत घडली.

अतुल अविनाश पवार (रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी 21 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतुल आणि फिर्यादी महिला यांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर आरोपीने फिर्यादी रस्त्याने पायी जात असताना त्यांचा रस्ता अडवून तिच्याशी जवळीक साधून दमदाटी केली. तसेच आरोपीच्या मोबाईल फोनवर अश्लील मेसेज पाठवून फिर्यादी यांना त्रास दिला. याबाबत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.