Wakad : टिकटॉकवर अपलोड केलेल्या व्हिडिओत एडिटिंग करून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – टिकटॉक या सोशल साईटवर महिलेने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये एडिटिंग करून महिलेची बदनामी केली. याप्रकरणी तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 20 ते 23 नोव्हेंबर 2019 या कालावधीत वाकड येथे घडला.

गगन कांबळे (रा. हडपसर), प्रमोद साबळे (रा. हडपसर), प्रदीप वारकरी (रा. उस्मानाबाद) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने 17 फेब्रुवारी रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने तिच्या टिकटॉक अकाउंटवर तिचा व्हिडिओ बनवून अपलोड केला होता. आरोपींनी महिलेची बदनामी होईल अशी त्या व्हिडिओमध्ये एडिटिंग करून व्हायरल केला. याबाबत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.