Wakad : घरगुती कारणावरून पत्नीचा खून

एमपीसी न्यूज – घरगुती कारणावरून पत्नीचा गळा (Wakad) आवळून पतीने खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. 31) सकाळी तापकीरनगर, काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

 

E-Filing News : ई-फायलिंगच्या अंमलबजावणीला पुन्हा मुदतवाढ

 

चुनमून विश्वामित्रा सिंग (वय 20, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी खून झालेल्या महिलेचे वडील राजेंद्र प्रल्हाद वाघमारे (वय 52, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीला घराच्या पैशांवरून आणि घरगुती कारणांवरून तिचा पती चुनमून याने गळा आवळून ठार मारले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता चुनमून याच्या घरी घडली. पोलिसांनी (Wakad) आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.