Wakad : भिंत बांधल्याचा कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद; परस्परविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भिंत बांधल्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये भांडणे झाली. हा प्रकार सोमवारी (दि. 18) रात्री साडेनऊच्या सुमारास थेरगाव येथे घडला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

युसूफ शफिक व्हरेकरी (वय 27, रा. पावरनगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार, आशा राम दौंडकर (वय 41), राम दौंडकर (दोघे रा. पवारनगर, थेरगाव) यांच्यासह त्यांचे चार नातेवाईक (नाव व पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

युसूफ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी त्यांच्या घरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावर भिंत बांधली. याचा जाब विचारण्यासाठी ते गेले असता आरोपींनी आपसात संगनमत करून त्यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.

याच्या परस्परविरोधात आशा राम दौंडकर (वय 41, रा. पवारनगर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, युसूफ व्हरेकरी व त्यांचे चार ते पाच साथीदार (नाव व पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आशा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी स्वतःच्या मालकीच्या जागेत भिंत बांधली. आरोपी युसूफ याने साथीदारांच्या मदतीने भिंत पाडून आशा व त्यांच्या पतीला शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.