Wakad : पुतण्याने फोडले चुलत्याचे नाक; चुलता गंभीर जखमी

Nephew blows cousin's nose; Cousin seriously injured

एमपीसी न्यूज – आई आणि मुलामध्ये सुरू असलेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून भावाने आणि भावाच्या मुलाने आईला भांडणा-या मुलाला बेदम मारहाण केली. त्यात पुतण्याने चुलत्याच्या नाकावर मारून नाकाचे हाड फ्रॅक्चर केले.

ही घटना 15 मे रोजी सायंकाळी सहा वाजता अण्णाभाऊ साठे नगर, वाकड येथे घडली आहे. याबाबत 25 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महादेव साधू कदम (वय 30, रा. अण्णाभाऊ साठे नगर, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आप्पा साधू कदम, मोहन आप्पा कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महादेव यांचे त्यांच्या आईसोबत घरगुती कारणांवरून भांडण सुरू होते. त्यावेळी महादेव यांचा मोठा भाऊ आरोपी आप्पा तिथे आला. ‘तू आईसोबत का भांडतोस’ असे म्हणून आप्पाने महादेव यांच्याशी वाद घातला.

आरोपी आप्पा याने महादेव यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर आरोपी मोहन याने महादेव यांच्या तोंडावर फाईट मारून महादेव यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केले. महादेव यांच्या दोन्ही भुवयांच्या वर मारून त्यांना गंभीर जखमी केले.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like