Wakad News : गतिमंद मुलगी राहत्या घरातून बेपत्ता

एमपीसी न्यूज – रहाटणी परिसरातून एक गतिमंद मुलगी राहत्या घरातून निघून गेली. तिला बोलता येत नाही. तसेच चालताही येत नाही. त्यामुळे तिचा शोध घेण्यास पोलीस व नातेवाईकांना अडचण येत आहे.

बिमला कृष्णा बुढा (वय 24, रा. ड क्षेत्रीय कार्यालयाच्या मागे, रहाटणी) असे बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिमला हिला बोलता येत नाही. तसेच तिला व्यवस्थित चालताही येत नाही. 13 ऑगस्ट रोजी ती राहत्या घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेली आहे.

रंगाने गोरी, उंची पाच फूट चार इंच, चेहरा गोल, केस काळे, नेसणीस लाल टॉप व काळा कुर्ता असलेला सलवार आहे. तिचे वरचे दात पडलेले आहेत. वरील वर्णनाची मुलगी निदर्शनास आल्यास संबंधितांनी वाकड पोलीस स्टेशन (020 27261120, 27261130) तसेच 8975791029, 9623459097 या क्रमांकावर माहिती देण्याचे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.