Wakad News: रस्त्यामध्ये पार्क केलेली दुचाकी काढण्यास सांगितल्यावरून पोलिसाला मारहाण

आरोपीने त्याची दुचाकी रस्त्याच्या बाजूला न घेता फिर्यादी यांच्याशी वाद घातला. त्यांना मारहाण केली.

एमपीसी न्यूज – रस्त्यामध्ये पार्क केलेली दुचाकी काढण्यास सांगितल्यावरून एका तरुणाने पोलीस कर्मचा-याला मारहाण केली. ही घटना 29 ऑगस्ट रोजी रात्री पावणे अकरा वाजता थेरगाव येथील मयुरेश्वर मंदिर येथे घडली. पोलिसांनी मारहाण करणा-या तरुणाला अटक केली आहे.

तेजस रामचंद्र जाधव (वय 28, रा. एकता कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस नाईक एस एस सोनपेटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनपेटे वाकड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. आरोपीने 29 ऑगस्ट रोजी रात्री पावणे अकरा वाजता त्याची दुचाकी (एमएच 14 एक्स 0314) ही दुचाकी वाहतुकीस अडथळा होईल, अशी रस्त्यावर पार्क केली होती. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीला त्याची दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले.

आरोपीने त्याची दुचाकी रस्त्याच्या बाजूला न घेता फिर्यादी यांच्याशी वाद घातला. त्यांना मारहाण केली. याबाबत आरोपी तेजस याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तेजस याला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.