Wakad News : टाटा आणि पुणे मेट्रोच्या आरोग्य शिबिरात 41 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज – टाटा आणि पुणे मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शिबिरात 41 जणांनी रक्तदान केलं आहे. शनिवारी (दि. 06) येथे भुमकर चौक, वाकड याठिकाणी हे आरोग्य शिबिर पार पडले.

_MPC_DIR_MPU_II

सुरक्षा सप्ताह निमित्त टाटा प्रोजेक्ट आणि पुणे मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होतं. राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात कर्मचा-यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच, 41 जणांनी रक्तदान केलं. थेरगाव सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.